सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आशा गणेश जाधव रा. मंगळवार पेठ, सातारा या विवाहितेचा सन 2020 ते 29 जून 2025 दरम्यान जाचहाट केल्याप्रकरणी पती गणेश सर्जेराव जाधव यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.