सातारा : पिंपळवाडी धावडशी येथे जुन्या गावठाणच्या जागेवर घराचे बांधकामाच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद निर्माण होऊन एकमेकांना मारहाणीची घटना घडली आहे. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजरंग बाबुराव फाळके यांनी प्रवीण परशुराम फाळके (वय ३४ रा. पिंपळवाडी ता. सातारा) यांना दगड मारला. यावेळी प्रवीण फाळके याचे वडील येथे आल्यावर सौरभ फाळके याने वडिलांना धरून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विजय बाबुराव फाळके, अमीर राजेंद्र फाळके, हर्षद बजरंग फाळके, बजरंग बाबुराव फाळके आणि सौरभ विजय फाळके यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर सौरभ विजय फाळके (वय १९) याच्या फिर्यादीवरून प्रवीण परशुराम फाळके, प्रकाश तात्या इंगळे, रुक्मिणी प्रकाश इंगळे, परशुराम दगडू फाळके,विजया परशुराम फाळके आणि मच्छिंद्र धर्मु फाळके (सर्व रा. पिंपळवाडी,सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे आणि महिला पोलीस हवालदार कुंभार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.