सातारा : दूर्गा देवी मुर्तीचे विसर्जन 12 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. विसर्जनाच्या पारंपारिक मार्गावर कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये, वाहतुकीची कोंडी होवू नये याकरीता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस अधिनियम 1551 चे कलम 34 प्रमाणे दि. 3 ऑक्टोंबर दुर्गादेवी प्रतिष्ठापना व 12 ऑक्टोंबर विसर्जन दोन्ही दिवशी मार्गावर दोन्ही बाजूस कोणत्याही वाहन पार्कींग करण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.