सातारा : तालीम संघ रस्त्यावर काही कारण नसताना चारचाकीची काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, क्षीतिज संतोष पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) याने तक्रार दिली असून, साहिल इनामदार, अफताब महाडवाले आणि राज (सर्वांचे पूर्ण नाव आणि पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. 24 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. तक्रारदार आणि विरोधक हे एकमेकांच्या ओळखीचे नाहीत. तरीही काही एक कारण नसताना तक्रारदाराच्या चारचाकीची मागील आणि चालक बाजूची काच फोडून नुकसान करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक आमते तपास करत आहेत.