वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात फारशा सक्रिय नाही दिसत

by Team Satara Today | published on : 23 August 2024


अभिनेत्री वर्षा उसगांवकर या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे वर्षा उसगांवकर याच बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धक आहेत. वर्षा उसगांवकर यांनी फक्त मालिकाच नाही तर चित्रपटांमध्येही मोठा काळ गाजवला आहे. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. वर्षा उसगांवकर यांनी महाभारत मालिकेत देखील काम केले. महाभारत मालिकेच्या वेळीच त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत आले होते. वर्षा उसगांवकर त्यावेळी अभिनेता नितीश भारद्वाज याला डेट करत होत्या. सेटवरच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. मात्र, काही दिवसांमध्येच ब्रेकअप झाले.

बिग बॉस मराठी सीजन 5 च्या सुरूवातीच्या काळात वर्षा उसगांवकर या धमाकेदार गेम खेळताना दिसल्या. हेच नाही तर निकी तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला. वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यातील वाद टोकाला गेला. यावेळी अनेकांनी निकी तांबोळी हिच्यावर टीका केली.

हेच नाही तर निकी तांबोळी हिचा क्लासही रितेश देशमुख याने त्यावरूनच लावला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात फार काही सक्रिय दिसत नाहीत. सुरूवातीचे दोन आठवडे त्यांनी बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये जबरदस्त असा गेम खेळला. मात्र, आता त्या बिग बॉसच्या घरात कुठेतरी गायब झाल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी थेट म्हटले की, वर्षा उसगांवकर नेमक्या कुठे गायब झाल्या?

वर्षा उसगांवकर या अंकितासोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसत आहेत. ज्यावेळी निकी तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये वाद सुरू होते, त्यावेळी त्या चर्चेत होत्या. नुकताच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनचा एक टास्क झाला. या टास्कमध्ये वर्षा उसगांवकर जास्त सक्रिय दिसल्या नव्हत्या. वर्षा उसगांवकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल निकी तांबोळी हिने कमेंट केली होती.

वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल निकी तांबोळी हिने थेट म्हटले होते की, आईची माया काय असते हे यांना कसे समजणार ना? यावरून जोरदार टीका करण्यात आली. रितेश देशमुख यानेही निकी तांबोळीचा यावरून क्लास लावला होता. यानंतर वर्षा उसगांवकर यांची माफी मागतानाही निकी तांबोळी ही दिसली. सोशल मीडियावरही यावरून निकी तांबोळी हिला चांगलेच खडेबोल सुनावले जात होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कांतारा सिनेमाचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला
पुढील बातमी
पोर्श अपघात प्रकरणी विशाल-शिवानी अग्रवाल यांच्यासह 6 आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले

संबंधित बातम्या