गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून होणार घोषित

by Team Satara Today | published on : 10 July 2025


मुंबई : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये तर गणेशोत्सवासाठी लगबग सुरु झाली असून, मूर्तीकारही गणेशमूर्ती तयार करण्यात व्यग्र आहेत. तसंच घरच्या गणपतीची मूर्ती निवडण्यासाठी बाजारांमध्ये नागरिकांची लगबग सुरु झाली आहे. यादरम्यान गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. 

भाजपाचे कसबा पेठचे आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी रासने यांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले, "महाराष्ट्राचा गणेशोत्सव 1893 रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला. घऱोघरी तो सुरु होताच. त्याची एक पार्श्वभूमी सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित होतं आणि त्याच पद्धतीन चालू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव उत्सव म्हणून घोषित करेल हे मी आजच स्पष्ट करतो".

पुढे ते म्हणाले, "त्यांनी निर्बंधांचा उल्लेख केला. काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या न्यायालयात केला. पण महायुतीच्या सरकारने या सर्व निर्बंधांना, या सर्व स्पीड ब्रेकरला बाजूला करण्याचे काम केलं. मी न्यायाधीशाचं नाव घेणार नाही, ते निवृत्त झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून झालेल्या निवाड्यात जणू  पोलिसांनी, महापालिकांनी परवानगीच देऊ नये यासाठी प्रयत्न सुरु होता". 

रस्ते, मैदानं, नागरी वस्त्या निर्मित होण्याऐवजी तिथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होत होते. तरीही ती कारणं देत तिथे आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला असाही दावा त्यांनी केला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काशीळ-कोपर्डे पुलाचा प्रश्न मार्गी लावणार : आ. मनोज घोरपडे
पुढील बातमी
फक्त 6 दिवसांत निर्मात्यांना कोट्यवधीचा नफा देणारा चित्रपट; जुरासिक वर्ल्ड

संबंधित बातम्या