सातारा : जुगार प्रकरणी पोलिसांनी दोनजणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुना मोटर स्टॅन्ड येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल केला. संजय मारुती भोसले (वय 53, रा. एकसळ ता.कोरेगाव) व चंद्रमणी धनंजय आगाणे (वय 35, रा. कोडोली, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 450 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.