मारहाण प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर ता. सातारा येथील पर्णकुटी रेस्टॉरंट येथे तेथीलच आझाद शब्बीर घुणके यांनी रेस्टॉरंटमध्ये सिगारेट ओढू नका, असे म्हटल्याच्या कारणावरून आयुष भोसले आणि त्याच्यासोबत असणाऱ्या तीन जणांनी (नाव पत्ता माहीत नाही) घुणके यांना लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली. तसेच रेस्टॉरंट मधील किचनची तोडफोड करून नुकसान केले आहे. अधिक तपास पोलीस नाईक जगताप करीत आहेत.


मागील बातमी
साडेपाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी वकिलासह दोन जणांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
अल्पशा आजाराने सचिन श्रोत्री यांचे निधन

संबंधित बातम्या