सातारा : सासऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी जावया विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी दुपारी साडेतीन वाजता लालचंद बाबुराव जाधव रा. शाहूनगर, गोडोली, सातारा यांना त्यांचे जावई शाबीर शकील डांगे रा. बुधवार पेठ, सातारा यांनी दारू पिऊन मारहाण केल्याप्रकरणी डांगे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करीत आहेत.