प्रेमसंबंध संपविल्याच्या रागातून तरुणीला धमकी देणाऱ्या युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा : प्रेमसंबंध संपविण्याचा निर्णय घेतल्यानंतर तरुणीला शिवीगाळ, दमदाटी करून धमकी दिल्याप्रकरणी युवकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेदरे येथे ४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. याबाबत २६ वर्षीय तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली असून अल्ताफ नूरमोहम्मद इनामदार (रा. पवाराची निगडी, ता. सातारा) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, दोघांमध्ये आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, संबंध पुढे ठेवायचे नसल्याचे सांगून तरुणीने भेटणे, बोलणे व फोन करणे बंद करण्यास सांगितले होते. याचा राग आल्याने संशयिताने तिच्या घरासमोर शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच स्वतःला इजा करण्यासह तरुणी व तिच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधिताविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळे सज्ज; विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा अलर्ट; नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्याकडून सुविधांची पाहणी
पुढील बातमी
नोटीस देऊनही नगरपरिषदेच्या जागेवरील बांधकाम न हटवल्याने कोडोलीतील दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या