भिलार-पाचगणी परिसर पावसाळी पर्यटनाने बहरला

by Team Satara Today | published on : 04 August 2025


पाचगणी : रिमझिम पाऊस, अंगाला झोंबणारा वारा, हिरवागार निसर्ग आणि फेसळणारे धबधबे पहायला भिलार व c परिसर पावसाळी पर्यटनाने बहरला आहे. भिलार व पाचगणी परिसरात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी कधी उन्ह तर कधी रिमझिम पडणारा पाऊस पर्यटकांना मोहित करत आहे.

पाचगणी येथील पावसाळी पर्यटन हंगाम सुरू असून पर्यटक सुट्टीच्या दिवशी गर्दी करत आहेत. शनिवार, रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथील निसर्ग पाहायला, पावसाचा आनंद घ्यायला येत आहेत. पावसामुळे येथील निसर्गाचे रूप पालटले असून डोंगररांगा हिरव्या शालू परिधान केल्या सारख्या दिसत आहे. मधूनच फेसळणारे धबधबे, अंगाला झोंबणारा वारा तर कधी दाट धुक्यात हरवलेल्या पर्वतरांगा , भिलार वॉटर फॉल जवळील फेसळणारा धबधबा, पारशी पॉइंट व सिडने पॉइंट वरून धोम आणि बलकवडी धरणाचे तसेच जावली तालुक्यातील महू जलाशय विहंगम दृश्य मनाला मोहीत करत आहेत.

भिलार येथील पुस्तकाच्या गावाला तसेच किंग्जबेअरी, मॅप्रो गार्डन येथे पर्यटक गर्दी करत आहेत. सध्या पावसाळ्यात युवक- युवती, अबालवृद्ध तसेच हौशी पर्यटक पर्यटनांसह पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत. थंडगार वार्‍याबरोबर आइस्क्रीम, चणे आणि भाजलेल्या मक्याच्या कणसांवर ताव मारला जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एअर मार्शल सुनील काशिनाथ विधाते, AVSM, YSM, VM, एअर ऑफिसर-इन-चार्ज पर्सोनेल (AOP), यांची सैनिक स्कूल सातारा येथे भेट
पुढील बातमी
कल्पनाचा मतृदेह आढळला गोंदी हद्दीत

संबंधित बातम्या