सातारा व वर्णे येथील दोन दुचाकींच्या चोरीप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 October 2026


सातारा : सातारा शहर सह बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकींची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रोहन कृष्णा नाईक (रा. खेड, सातारा) यांची लँडमार्क सोसायटी, सदर बझार येथे लावलेली दुचाकी क्र. एमएच 11 डीएस 0821 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 24 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुनील भगवान काळंगे (रा. वर्णे, ता. सातारा) यांची घरासमोर अंगणात लावलेली दुचाकी क्र. एमएच 11 डीवाय 2490 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकीला धडक देऊन एकास जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा
पुढील बातमी
निनाम येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या; बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद

संबंधित बातम्या