'मितवा' या सिनेमानं 'मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या' हे दिलेलं सूत्र आजही प्रेक्षकांच्या आठवणीत

स्वप्नील जोशीच्या सिनेमाचे खास किस्से

मुंबई  : आजपासून दहा वर्षांपूर्वी म्हणजेच १३ फेब्रुवारी, २०१५ रोजी एक अनोखी लव्हस्टोरी मराठीच्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली होती. 'मितवा' या सिनेमानं 'मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या' हे दिलेलं सूत्र आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. दशकपूर्तीच्या निमित्तानं सिनेमाचा नायक स्वप्नील जोशी यानं आठवणींना उजळा दिला आहे.

आजवर स्वप्नीलनं त्याच्या सिनेकारकिर्दीत अनेक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये काम करून नवनवीन भूमिका साकारल्या. त्यातल्या अनेक भूमिका या तितक्याच खास आणि रोमँटिक होत्या. 'मितवा' मधील स्वप्नीलच्या भूमिकेनं केवळ प्रेक्षकांची मन जिंकली नाही तर तरुणांना वेड लावलं. 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी' अशा चित्रपटांमधून तयार झालेली त्याची लव्हरबॉयची इमेज 'मितवा' मुळे अधोरेखित झाली.

'मितवा' बद्दलच्या आठवणींना उजळा देताना स्वप्नील सांगतो, "मितवा' आमच्या आयुष्यातला खूप महत्त्वपूर्ण सिनेमा आहे. त्याला अनेक कारणं आहेत चित्रपटाची कथा, टायटल यामुळे या चित्रपटातलं वेगळेपण लक्षात राहतं. शंकर-एहसान-लॉय या त्रयींचं संगीत असलेली गाणी माझ्यावर चित्रित झाली, ही भाग्याची गोष्ट घडली. सोनली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे या दोघींसारख्या अत्यंत गुणी कलाकार मैत्रिणी या सिनेमांच्या निमित्तानं माझ्यासोबत जोडल्या गेल्या. 

'मितवा' ही मराठी सिनेविश्वातील आगळीवेगळी लव्हस्टोरी होती आणि 'मितवा'च्या आधी प्रेमातल्या त्रिकोणाच्या कथा घेऊन आलेले अनेक चित्रपट आले, पण 'हार्डकोर' लव्हस्टोरी असलेला 'मितवा' हा सिनेमागृहात खूप उत्तम चालला. सोबतच मराठी चित्रपटसृष्टीत हेलिकॉप्टरमधून उतरणारा अभिनेता दाखवणं असो किंवा दमदार लव्हसाँग करणं असो, हे सगळं मितवामुळे शक्य झालं. ज्या गोष्टीसाठी आपण बॉलिवूडपट बघायचो त्याला तोडीस तोड देणारा मितवा मराठीमध्ये घडला, याचा खूप आनंद आहे.'

आज १० वर्षांनी सुद्धा मितवा चित्रपटाची तीच जादू बघायला मिळते. मितवा जरी १० वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही हा चित्रपट तितकाच एव्हरग्रीन आहे.

स्वप्नीलच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं काही मराठी सिनेमांची घोषणा केली असून अभिनयासोबतच तो आता निर्माता म्हणूनही समोर येत आहे.

अशी झालेली प्रार्थनाची निवड

तर ‘नाईन एक्स झक्कास हिरोईन हंट’ या स्पर्धेतून निवड झाल्यानंतर प्रार्थनाला या सिनेमात काम करायची संधी मिळाली होती.

मागील बातमी
आरटीई प्रवेश नाकारल्यास कारवाई
पुढील बातमी
दासबोध ग्रंथ वाचन पारायण सोहळ्याने दासनवमी उत्सव कार्यक्रमांना प्रारंभ

संबंधित बातम्या