सातारा : अपघातात एका महिलेस जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट ते पोवई नाका रस्त्यावर अतुल दत्तात्रय झोरे रा. विसावा नाका पार्क, सातारा यांची आई पिठाच्या गिरणीतून दळण घेऊन पायी चालत जात असताना स्प्लेंडर क्र. एमएच 11 डीक्यू 8202 वरील चालक नंदकुमार संजय इंगवले रा. किडगाव, ता. सातारा याने त्याच्या ताब्यातील गाडी बेदरकारपणे चालवून झोरे यांच्या आईला धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.