दहिवडी : मुंबईतील वेलिंग्टन जिमखाना येथे नुकत्याच झालेल्या ४-स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत माण तालुक्यातील मलवडीचा सुपुत्र पार्थ मगरने एकत्रित जिल्हा श्रेणीमध्ये तिहेरी मुकुट पटकावला आहे.
पार्थने १७, १९ वर्षांखालील आणि पुरुष गट या तीन गटात सुवर्णपदक पटकावले. विविध जिल्ह्यांमधील अव्वल खेळाडूंकडून कडवी स्पर्धा असूनही पार्थने तिन्ही गटांमध्ये अचूकता, सातत्य आणि मानसिक धैर्य दाखवत विजय मिळवला. ठाणे येथील एनएससीआय स्पोर्टस्क्लबमध्ये नियमित प्रशिक्षण घेणाऱ्या पार्थने सातत्याने आपल्या कौशल्यात सुधारणा केली आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.