सातारा : शाहूपुरीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 ते 8 मे दरम्यान कमल सुधीर निकम रा. शाहूपुरी, सातारा यांच्या बंद घरातील लोखंडी कपाटातील लॉकर मधील 2 लाख 77 हजार 338 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.