सातारा : केसरकर पेठ येथे मानस हॉटेल जवळ राहणाऱ्या शितल सतीश मर्ढेकर (वय ३५), मुलगा सार्थक (वय १४) आणि मुलगी साक्षी सतीश मर्ढेकर (वय १६) हे राहत्या घरातून कोणास काही न सांगता दि १६ जानेवारी रोजी निघून गेले आहेत. याची मिसिंगची फिर्याद पती सतीश दशरथ मर्ढेकर (वय ४३) यांनी सातारा शहर पोलिसांत दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पत्नीसह मुलगा, मुलगी झाली बेपत्ता झाल्याची तक्रार
by Team Satara Today | published on : 07 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा