सातारा : मारहाण, दमदाटी प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आकाश शशिकांत पवार रा. एकता कॉलनी, करंजे पेठ, सातारा यांना धक्काबुक्की आणि धमकी दिल्या प्रकरणी सलीम बागवान, अजीम बागवान, मोहम्मदअली सलीम बागवान यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.
दुसऱ्या तक्रारीत मोहम्मद अली सलीम बागवान रा. एकता कॉलनी, करंज पेठ, सातारा यांना तसेच त्यांचे वडील व भाऊ यांना मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच आकाश पवार व अन्य दोन जणांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.