आसगाव येथील घरफोडीत 50 हजारांचे दागिने लंपास

by Team Satara Today | published on : 28 June 2026


सातारा : तालुक्यातील आसगाव येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आसगाव, ता. सातारा येथे शुक्रवारी (दि. 27) दुपारी 12 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत सौरभ रमेश शिंदे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाज्याचा आतून लावलेला कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स चोरून नेले.

याप्रकरणी सौरभ शिंदे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास हवालदार गोरे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दमदार पावसाने सातारकर चिंब; शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा
पुढील बातमी
विवाहितेचा जाचहाटप्रकरणी पती, सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या