सातारा : बोरगाव परिसरातील उरमोडी नदीपात्रात बसविण्यात आलेल्या मोटार पंपाच्या केबलमधील तांब्याची वायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शेतकर्यांचे सुमारे 45 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण नगर येथील स्मशानभूमीलगत नदीपात्रात अजित शंकरराव निकम व इतर शेतकर्यांनी मोटार पंपासाठी सुमारे 350 मीटर लांबीची कॉपर वायंडिंग केबल टाकली होती. 26 मे रोजी अज्ञात व्यक्तीने केबल फोडून त्यातील तांब्याची वायर चोरून नेल्याचे उघड झाले. याप्रकरणी अजित निकम यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार म्हेत्रे तपास करीत आहेत.