घरासमोर गाडी पार्क केल्याच्या रागातून वनवासवाडी येथे गाडीची तोडफोड

by Team Satara Today | published on : 27 December 2025


सातारा : वनवासवाडी येथे पोपट बबन बोराटे (वय ६०) यांनी त्यांची दुचाकी बाबुलाल अकबर शेख (वय ५८ रा.  वनवासवाडी सातारा) यांच्या घरासमोर पार्क केली म्हणून त्यांच्या गाडीला शेख यांनी लाथ मारून खाली पाडले. त्यांच्या गाडीचे पुढील मडगार्ड फोडून व गाडीचा पॅनल निसटवून नुकसान केल्याप्रकरणी बाबुलाल शेख यांच्या विरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कूस बुद्रुक (बनघर) येथे एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
ग्रंथप्रदर्शने संमेलनाचे खरे वैभव : प्रा. मिलिंद जोशी; सातारा ग्रंथ दालनातील २४२ गाळ्यांची सोडत

संबंधित बातम्या