अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 May 2026


सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन २0२0 ते २१ मे दरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिचा पाठलाग करुन तिच्या मोबाईलवर फोन करुन तिचा विश्वास संपादन करत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर अल्पवयीन मुलीला आणि तिच्या भावला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गणेश मधुकर कदम (वय २६ रा. गडकर आळी, सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जनसंपर्क वाढवा, संघटना मजबूत करा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत आवाहन
पुढील बातमी
वरण भात न आवडल्याने आईवर चाकूने वार; मुलाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या