सातारा : सातारा शहर पोलिसांनी सदर बाजार येथील जुगार अड्ड्यावर छापा मारुन एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बाजार येथील भीमाबाई आंबेडकर नगर चौकात झाडाच्या आडोशाला जुगार अड्डा चालवणार्या किरण दुर्गेश पुरंदर याला सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधिताला 2023 च्या 35 तीन प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सातारा शहर पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एक हजार तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.