९९व्या साहित्य संमेलनाचा बोधचिन्ह अनावरण समारंभ बुधवारी

वयाची शंभरी पार केलेल्या शि.दं.नी साकारले ९९व्या संमेलनाचे बोधचिन्ह

by Team Satara Today | published on : 04 September 2025


सातारा :  सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह वयाची शंभरी पार केलेले ख्यातनाम हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी साकारले असून बोधचिन्हाचा अनावरण समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे. शि. द. फडणीस यांनी साहित्य संमेलनासाठी साकारलेले हे पहिलेच बोधचिन्ह आहे.

बोधचिन्हाचा अनावरण समारंभ बुधवार, दि. १०सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बोधचिन्हाचे अनावरण शि. द. फडणीस यांच्या हस्ते होणार असून उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांची सन्मानीय उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेश विसर्जनासाठी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल
पुढील बातमी
विद्यार्थ्यांनो, विज्ञान हसत खेळत शिका : चंद्रकांत दळवी

संबंधित बातम्या