सातारा : चिंचणेर (ता. सातारा) गावच्या हद्दीत डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रतिक धनंजय काटे (रा. तासगाव, ता. सातारा) जखमी झाले. या अपघातप्रकरणी डंपरचालक शुभम तात्याबा मोहिते (रा. जाधववाडी, ता. सातारा) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचणेर गावच्या हद्दीत डंपर आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. या अपघातात काटे यांना दुखापत झाली. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार डंपरचालक मोहिते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सातारा तालुका पोलिस पुढील तपास करीत आहेत.
चिंचणेरमध्ये डंपरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 22 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा