'अजिंक्यतारा'चे सभासद निकम यांचा 'ऊस भूषण' पुरस्काराने सन्मान

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे सभासद प्रकाश विलास निकम यांचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांच्यावतीने 'ऊस भूषण' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. गळीत हंगाम २०२३- २४ करिता खोडवा पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले बद्दल निकम यांचा माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांचे हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, संतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम, साखर संघाचे अध्यक्ष पी, आर. पाटील आदी मान्यवरांच्या आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.  

अजिंक्यतारा कारखान्याचे अपशिंगे ता. सातारा येथील सभासद निकम यांनी सन २०२३- २४ या गळित हंगामात खोडवा पिक प्रकारात प्रति हेक्टर२६२.४० टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले बद्दल त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांचा मानाचा ऊस भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऊसाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी  कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कार्यकारी संचालक, मुख्य शेती अधिकारी आणि कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे प्रकाश निकम यांनी यावेळी सांगीतले. निकम यांना 'ऊस भूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले, कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कार्यकारी संचालक, मुख्य शेती अधिकारी यांनी अभिनंदन केले. 

मागील बातमी
स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांचे योगदान मोलाचे : डॉ. सुरेशराव जाधव
पुढील बातमी
आयुष विभागामार्फत योगग्राम सांबरवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न

संबंधित बातम्या