सातारा : वळसे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीच्या चेअरमनपदी उत्तमराव विठोबा नावडकर तर, व्हा. चेअरमनपदी अजित सदाशिव साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सूत गिरणीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठीची निवडणूक नुकतीच पार पडली असून अध्यासी अधिकारी श्रीमती उज्वला पळसकर यांनी या निवडी जाहीर केल्या.
निवडीनंतर संस्थेचे मार्गदर्शक संचालक, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नवनिर्वाचीत चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या चेअरमनपदासाठी उत्तमराव नावडकर यांचे नाव सचिन गायकवाड यांनी सुचविले त्यास देवदत्त राजमाने यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी अजित साळुंखे यांचे नाव राजकुमार कणसे यांनी सुचविले त्यास सौ. रत्नमाला डांगे यांनी अनुमोदन दिले. विहीत मुदतीत इतर कोणाचेही अर्ज दाखल न झालेने अध्यासी अधिकारी यांनी नवनिर्वाचीत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड जाहीर करून त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक अशोक काठाळे, गणपतराव मोहिते, आबासो साबळे, संजय कदम, अशोक कदम, रघुनाथ जाधव, उल्हास भोसले, शिवाजी भोसले, सुरेश टिळेकर, जगन्नाथ किर्दत, बापूराव महाडिक, भरत मतकर, शशिकांत जाधव, सौ. साधना फडतरे आदी उपस्थित होते.