जिल्हा बँकेच्या मतदार यादीवरील ४९ हरकतींचा निपटारा; आता अंतिम मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष

by Team Satara Today | published on : 09 September 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या ४९ हरकतींचा कोल्हापूर विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी निपटारा केला. त्यामुळे बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विविध सभासद संस्था व संबंधितांकडून ४९ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेऊन विभागीय सहनिबंधक डॉ. कदम यांनी निर्णय दिला. त्यामुळे आता अंतिम मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बँकेची अंतिम मतदार यादी ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीमध्ये कोणाची नावे कायम राहतात, कोणत्या नावांमध्ये बदल होतात आणि मतदारसंख्या किती निश्‍चित होते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार राजकीय रस्सीखेच अपेक्षित असल्याने अंतिम मतदार यादी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या यादीकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाणी आणण्याचा शब्द पूर्ण करु शकलो आता जिहे-कठापूर आठमाही करण्याचे मिशन सुरु : ना. जयकुमार गोरे, मुळीकवस्ती येथे जिहे-कठापूर योजनेचे पाणीपूजन
पुढील बातमी
सातारकरांच्या बळावर पुढच्या वर्षी साताऱ्यात परिवर्तनाची दहीहंडी फोडू - प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, साताऱ्यात राष्ट्रवादीची दहीहंडी उत्साहात

संबंधित बातम्या