03:05pm | Nov 19, 2024 |
आपल्या शरीरात उद्भवणाऱ्या अनेक समस्यांवरचे उपाय हे आपल्या स्वयंपाकघरातच असतात. भारतीय स्वयंपाक घरातील सगळेच मसाले आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. यातीलच एक म्हणजे लवंग. लवंग प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात असते, परंतु तुम्हाला माहित आहे का की त्यात काही चमत्कारी गुणधर्म देखील आढळतात. खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासोबतच आरोग्याशी संबंधित समस्याही दूर करण्यातही छोटीशी लवंग गुणकारी आहे. रात्री झोपण्यापूर्वी लवंगाचे पाणी प्यायल्यास शरीराला अनेक आजारांपासून आराम मिळतो. लवंगात अँटीव्हायरस आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. लवंगाचे पाणी यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करते, पचनक्रिया मजबूत करते, सूज कमी करते, ब्राँकायटिस, कफ, सर्दी-खोकला आणि श्वसनाच्या समस्या देखील दूर करते. चला जाणून घेऊया याचे आणखी कोणते फायदे होतात?
लवंगाच्या पाण्याचे फायदे
१. यकृत डिटॉक्स करते.
२. दातदुखीपासून आराम मिळतो आणि कॅव्हिटीच्या समस्या कमी होतात.
३. रक्ताभिसरण चांगले राहते.
४. सूज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
५. लवंगाच्या पाण्यामुळे झोप सुधारते.
६. ब्राँकायटिसची समस्या दूर राहते.
७. दम्यासारख्या श्वसनाच्या समस्यांवर फायदेशीर.
८. फुफ्फुसातील श्लेष्मा काढून टाकण्यास मदत करते.
९. बुद्धी आणि एकाग्रता वाढवण्यास मदत होते.
लवंगाचे पाणी कधी प्यावे
रात्री झोपण्याच्या ३० मिनिटे आधी लवंगाचे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे संपूर्ण शरीराला आराम वाटतो आणि चांगली झोप लागते. यासोबतच शरीर तंदुरुस्त राहते आणि आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
लवंगाचे पाणी कसे बनवायचे?
१. प्रथम चार किंवा पाच लवंगा घ्या.
२. एक कप पाण्यात लवंग टाकून चांगले उकळा.
३. उकळताना झाकण ठेवा, म्हणजे वाफ आता राहील.
४. यानंतर हे पाणी तासभर थंड होऊ द्या.
५. आवडत असल्यास हे पाणी गोड करण्यासाठी अर्धा चमचा मध घालू शकता.
लवंगाचे इतर फायदे :
> लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात,जे दातांच्या समस्या आणि मुखातील दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. दात दुखणे,हिरड्यांची सूज किंवा जंतुसंक्रमणावरही लवंग उपयोगी पडते. लवंगाच्या तेलाने मसाज केल्यास दातदुखी कमी होऊ शकते.
> लवंग पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. लवंग पचनक्रिया उत्तेजित करण्यास मदत करते आणि जुलाब,गॅस,अपचन यासारख्या पचनविकारांवर नियंत्रण ठेवते. लवंग चहा किंवा काढा पिण्याने पचन प्रणाली सुधारू शकते.
>लवंगात अँटीऑक्सिडन्ट्स आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सचे नुकसान कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
>लवंगाचा नियमित वापर रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतो. हे हृदयविकारांची जोखीम कमी करण्यास आणि रक्तदाब संतुलित करण्यास सहाय्यक आहे.
> लवंग त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. लवंग तेलाचा वापर त्वचेवरील पिंपल्सआणि स्कीनबर्नवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |