सातारा : अपघातामध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 डिसेंबर 2024 रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास बोरणे, ता. सातारा गावच्या हद्दीत विजय मारुती मोरे रा. राजापुरी, ता. सातारा यांच्या दुचाकीस क्र. एमएच 11 बीआर 7817 ला तुषार प्रकाश चाळके रा. चाळकेवाडी, ता. सातारा याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एमएच 11 बीएम 6853 ने भरधाव वेगात समोरुन धडक दिली. या अपघातात मोरे हे जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तुषार चाळके यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 19 January 2025