वाढे गावातून मोटर सायकलची चोरी

by Team Satara Today | published on : 22 June 2026


सातारा : वाढे गावातून अज्ञात चोरट्याने मोटर सायकलची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वाढे, ता. सातारा येथील दीपाली संतोष जाधव यांच्या मालकीची बुलेट मोटरसायकल क्र. एमएच 11 सीझेड 8273 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस नाईक वायदंडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोंडवेत ४४ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; अकस्मात मृत्यूची नोंद
पुढील बातमी
लखनऊमधील पुरनिया चौकाजवळील एका कोचिंग सेंटरला भीषण आग; १४ मुलांचा होरपळून मृत्यू

संबंधित बातम्या