जुगारप्रकरणी सातारा शहरासह तालुक्यातील चारजणांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 12 October 2025


सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहरासह तालुक्यातील चार जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील वाढे फाटा परिसरातील एका हाॅटेलच्या आडोशाला सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर शाहूपुरी पाेलिसांनी छापा टाकून वामन पांडुरंग मोरे (वय ३६, रा. कामाठीपुरा, सातारा) याच्यावर कारवाई केली. त्याच्या ताब्यातून ८३० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलीस काॅन्स्टेबल राेहित बाजारे यांनी केली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

दुसऱ्या घटनेत, सातारा शहर पोलिसांनी गोडोलीतील एका मंदिराच्या आडोशाला सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून एकावर कारवाई केली. जाफर शहाबुद्दीन सय्यद (वय ५४, रा. उडतारे, ता. वाई) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ३१५० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस काॅन्स्टेबल रोहित निकम यांनी केली.

तिसऱ्या घटनेत, विजयनगर, ता. सातारा येथे जुगार घेताना जमीर कादीर शेख राहणार जिहे, ता. सातारा याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून १४५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

चौथ्या घटनेत, सातारा शहरातील पालिकेसमोरील पाण्याच्या टाकीच्या आडोशाला सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली. त्याच्या ताब्यातून ६१० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. ही कारवाई दि. १० रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आली. सागर शाम महामुने (वय ४५, रा. शनिवार पेठ, सातारा) असे कारवाई झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस काॅन्स्टेबल तुषार भोसले यांनी ही कारवाई केली. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गैरसमज पसरवणाऱ्या पोस्टपासून सावधान, अंतिम निर्णय माझे नेते खा. उदयनराजे भोसले घेतील : संग्राम बर्गे
पुढील बातमी
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या