सातारा : मोना स्कूल, सदर बझार परिसरात अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सदर बाजार परिसरात राहणाऱ्या एक महिला नाईट वॉक साठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या मोना स्कूल परिसरात आल्या असता त्यांच्या पाठीमागून मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे मिनी मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.