सातारा : नचिकेता एज्युकेशन सार्वजनिक धर्मादाय संस्थेत 2017- 18 मध्ये 4 कोटी 50 लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी चंद्रकांत लक्ष्मण म्हस्के (वय 63, रा. हडपसर, पुणे) यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने दहा जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नचिकेता एज्युकेशन सार्वजनिक धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष दिलीप सदाशिव घाडगे (वय 66, रा. पाचगणी), संचालक सुलताना दुलेखान शेख (वय 57), अभय उर्फ अशोक जगन्नाथ आगरकर (वय 59, दोघे रा. अहमदनगर), विश्वस्त विठ्ठल कृष्णा शिंदे (वय 67, रा. पाचगणी), लक्ष्मण मारुती पारटे (वय 53), सुधीर मारुती पारटे (वय 51, दोघे रा. पाचगणी), संजय सदाशिव घाडगे (वय 58, चिखली ता. वाई), सुशीला मारुती पारटे(वय 70), नैनिता दिलीप घाडगे (वय 58, दोघी रा. पाचगणी), सिमरन सुलतान शेख (वय 54, रा. अहमदनगर) यांनी संगनमत करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खोटे व बनावट दस्तएवज बनवले. रजिस्टर करारनामा न करता 4 कोटी 50 लाखांची रक्कम स्वतःसाठी वापरली. आणि संस्थेच्या निधीचा योग्य विनियोग केला नाही. याप्रकरणी चंद्रकांत लक्ष्मण म्हस्के यांनी न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायलयाच्या आदेशाने दहा जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.