01:24pm | Oct 05, 2024 |
सातारा : लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये कमालीचा श्रेयवाद सुरू आहे. राज्याची वित्तीय तूट दोन लाख तीस हजार कोटी इतकी प्रचंड आहे, तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करून राज्य शासन धडाधड वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे. राज्यात महिला अत्याचार वाढलेले असताना लाडक्या बहिणींच्या योजनेचे कौतुक केले जात आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, अशी घनाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.
सातारा जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर शाहू कला मंदिर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर सरकार शरण आल्यासारखे करत आहे. त्यांच्याकडून काही हवं असेल तर हीच वेळ आहे फक्त घोषणा मिळतील. प्रत्यक्षात काम मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेवरून तिन्ही घटक पक्षांमध्ये जोरदार श्रेयवाद सुरू आहे, नक्की योजना कुणाची यावरून मतमतांतरे सुरू असून, जो-तो आपापल्या पद्धतीने घोषणा करत आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीवर दोन लाख तीस हजार कोटी रुपयांचा प्रचंड बोजा आहे. घोषणा व दिलेली कामे करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सर्व फाइल्स वर महसूल व वित्त विभाग निधी नसल्याचे लिहीत आहे. तरीही अर्थमंत्र्यांचे न ऐकता उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून, मुख्यमंत्री धडाधड योजना जाहीर करत आहेत. परंतु बाणेदारपणा दाखवण्याऐवजी दोन्ही उपमुख्यमंत्री खुर्ची लाडकी असल्याने सोडायला तयार नसल्याची टीका पाटील यांनी केली.
दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी आभार मानले, राष्ट्रवादीचे बहुसंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |