आ. महेश शिंदे यांच्या वाढदिनी विक्रमी 1308 बाटल्या रक्त संकलित

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेमार्फत भव्य रक्तदान शिबीर संपन्न

by Team Satara Today | published on : 11 August 2025


सातारा : सातारा जिल्हयात, शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या आणि महाराष्ट्र शासनासह, जिल्हा परिषद साताराने विविध पुरस्कारांनी गौरविलेल्या, ‘श्री जानाई मळाई शिक्षण संस्था (जेमसेफ) सातारा’ या संस्थेने, संस्थेचे मार्गदर्शक-हितचिंतक-आधारस्तंभ ना. महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून, ‘समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, माने कॉलनी, कोडोली सातारा.’ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास अभूतपूर्व-अद्भूत प्रतिसाद मिळून विक्रमी 1308 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आ. महेश शिंदे यांच्या जेष्ठ भगिनी, सुप्रसिध्द नेत्रचिकित्सक डॉ. अरूणाताई बर्गे यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यकारी दंडाधिकारी वैभव पिलार, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, जि. प. सदस्य संदिपभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलताना डॉ. अरूणाताईंनी, ‘‘संस्थेच्या शैक्षणिक-सामाजिक कार्याबदद्ल गौरवोद्गार काढून म्हटले की, दिन-दलित-सर्व समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी संस्था करीत असलेले प्रयत्न अलौकीक असेच आहेत. कोरोना काळात सुध्दा रक्तदान, प्लाझ्मादान, मरणोत्तर अवयवदान तसेच सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेले उपक्रम मी स्वत: अनुभवले असून, संस्थेचे कार्य इतर संस्थांना दिशादर्शक असेच आहे. ही संस्था सर्वसामान्य जनतेसाठी आधारवड ठरली आहे. आ. महेशदादा शिंदेच्या मार्गदर्शनाखाली आणि भक्कम पाठिंब्याच्या आधारे या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल. नावलौकीक वाढत जाईल.’’
शिक्षणाधिकारी चोपडे यांनी तसेच कार्यकारी दंडाधिकारी पिलार यांनी सुध्दा संस्थेच्या कार्याबदद्ल गौरवोद्गार काढले. जि. प. सदस्य संदिपभाऊ शिंदे यांनी सुध्दा समयोचित भाषण करून, संस्थेच्या पाठीशी माझे पाठबळ राहील, असे सुतोवाच केले.
या रक्तदान शिबीरावेळी मुसळधार पावसाचा प्रचंड अडथळा आला होता. शिबीर स्थळ संपूर्ण ओलेचिंब झाले असतानाही अशा बिकट प्रसंगी सुध्दा शेकडो रक्तदात्यांनी आ. महेशदादा व संस्थेवरील प्रेमापोटी बिलकूल विचलीत न होता भर पावसात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून, एक आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवून एक विक्रम प्रस्थापित केला.
या विक्रमी शिबीराविषयी बोलताना अनेक जाणकरांनी सांगितले की, सातारा जिल्ह्याच्या इतिहासात एवढे मोठे रक्तदान शिबीर आणि एवढ्या शिस्तबध्द पध्दतीने पार पडल्याचे ऐकिवात नाही. जानाई मळाई संस्थेचे पदाधिकारी-कर्मचारी या विक्रमी शिबीराच्या कौतुकीस निश्‍चितच पात्र आहेत.
यावेळी आ. महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, जनता बँकेचे माजी चेअरमन आनंदराव कणसे, संभाजीनगरचे सरपंच सुभाष मगर, धनगरवाडीचे माजी सरपंच नंदकुमार माने, समर्थनगरचे सरपंच फिरोज शेख तात्या, अमर किर्दत, युवा नेते अमोल तांगडे, अमोलभाऊ जाधव यांनी शिबीर स्थळी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
डॉ. अरूणाताई बर्गे, पंचायत समिती सदस्य रामदास साळूंखे, कोडोलीचे सरपंच मनोज गायकवाड, सिनेस्टार भक्ती जावळे, सिनेस्टार सुहास भोसले, डॉ. महेश कुलकर्णी, ज्वेलर्सचे व्यवस्थापक अंजली चव्हाण, युवा नेते सागर लोहार, वर्णे गावचे नेते जयसिंग आण्णा काळंगे आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष रक्तदान करून संयोजकांना रक्तदात्यांना प्रोत्साहित केले.
या रक्तदान शिबीरामध्ये मौजे जायगांव ता. कोरेगांव, कोडेाली, संभाजीनगर, समर्थनगर, धनगरवाडी, खिंडवाडी, कारंडवाडी, देगांव, वर्णे, कुसवडे, निनाम, पाडळी, चिखली, जांभे, गावचे ग्रामस्थ, बहूसंख्य पालक सर्व धर्मीय स्त्री-पुरूष रक्तदात्यांनी सहभाग घेतला. खासकरून मुस्लिम धर्मीय रक्तदात्यांची व स्त्रियांची लक्षणीय उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
या शिबीराविषयी माहिती देताना संस्थेचे सचिव संजीव माने म्हणाले, गेली काही वर्षे आपल्या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीराचे दरवर्षी आयोजन केले जाते. दरवर्षी शिबीरामधून रक्त बाटल्या संकलनाचा वाढता आलेख राहिला आहे. यावर्षी आम्ही आमच्या विविध विद्यालयात रक्तदान विषयक विविध उपक्रम आयोजित करून ‘रक्तदानाची चळवळ’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचे निश्‍चितच फळ आम्हाला विक्रमी रक्त बाटल्यांच्या संकलनातून मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी रक्तदान विषयक जे पोस्टर्स तयार केले आहेत त्यांचे प्रदर्शन सुध्दा शिबीर स्थळी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा कदम, प्रतिभा जाधव यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव संजीव माने, संचालिका वासंती माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू माने (अध्यक्ष), सलिम मुलाणी, दत्तात्रय काळे, अक्षय माने, शामराव पवार, आय्यान मुलाणी, अमोल साळूंखे, सुखदेव शिंदे, विजय सदावर्ते, प्रदिप चपटे, माधुरी जाधव, दिपमाला लोहार, वैशाली भिसे, सुरज शेडगे, अर्चना घाडगे, संजय शिंदे, लहू जाधव आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक ऍड. मनजीत माने, चंद्रहार माने, ऍड. संकेत माने, राहूल गोडसे, गिरीष ढेंबरे, सुनिल जाधव, सचिन भोसले, फिरोज मुलाणी, वनिता भंडारे, बजरंग देशमुख, वैभव माने, सौ. हिरेमठ, सौ. संगिता माने अनिता गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

वातावरणाने भारावल्या डॉ. अरुणाताई बर्गे... स्वत:ही केले रक्तदान
श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे तरुणाई करीत असलेले रक्तदान पाहून डॉ. अरुणाताई बर्गेही भारावल्या. त्यांनीही रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली. ते पाहून सगळेजण आवाक झाले. मात्र, अरुणाताईंनी आग्रहपूर्वक रक्तदान करुन समाजाप्रती असलेली जाणीव दर्शवून एक चांगला आदर्श घालून दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पृथ्वीराज बाबांच्या पाठपुराव्यानेच विमानतळ विस्तारसाठी वेळोवेळी निधी : नामदेवराव पाटील
पुढील बातमी
क्षेत्र माहुली येथील ऍट बेथानी ट्रस्ट च्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करावी

संबंधित बातम्या