कातर खटाव : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खटाव- माण तालुक्यात पुरेसा पाऊस नसलेले शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा वेळीला दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय सदस्य रणजीतसिंह देशमुख, डॉ. महेश गुरव, शेतकरी संघटनेचे नेते अनिल पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत कातरखटाव ता. खटाव या ठिकाणी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सध्या सर्वत्र पावसाळ्याच्या सरी कोसळत असून अनेक ठिकाणी नदी, नाले, विहिरी, ओढे पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात दरड कोसळून दुर्घटना घडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या खटाव व माण तालुक्यात पाऊस नसल्याने शेतीची पेरणी रखडलेली आहे.
अशा वेळेला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खटाव माण तालुका दुष्काळ जाहीर करावा. यास उरमोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाणी त्वरीत सोडावे, खटाव तालुकाच्या पूर्व भागासाठी तारळी योजनेचे पाणी उपलब्ध करून दयावे, खरीप हंगाम वाया गेल्याने त्याची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, पिक कर्ज संपूर्णपणे माफ करावे, नियमित कर्ज फेडणा-या शेतक याना प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत मिळावे, उचाईग्रस्त गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी ट्रॅकर बालू करावेत, जनावरासाठी चारा पाण्याची सोय करावी, अशा मागण्यांचे निवेदन कातर खटाव मंडलाधिकारी बाबर यांना देण्यात आले.
या रास्ता रोको आंदोलनासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व घटक पक्षाने सहभाग घेतला होता. या मोर्चाला ज्येष्ठ नेते संजीव साळुंखे, सत्यवान कांबळे, परेश जाधव राजू मुलाणी, सत्यवान कमाने, दत्ता केंगारे, राहुल सजगणे, निलेश घार्गे, बाबासाहेब माने, शिवाजीराव यादव, हणमंत भोसले, संजय पानसकर, दिंगबर देशमुख, निलेश पोळ, मोहन देशमुख, अमरजीत कांबळे, ॲड. संदीप सजगणे, इम्रान बागवान,, खटाव महिला तालुकाध्यक्ष सुजाता महाजन, संतोष दुबळे व सूर्यभान जाधव, जयकुमार बागल, दत्तू काका घार्गे, वैभव पाटील, मुबारक मुल्ला, बाबासाहेब पाटील, अमित चव्हाण, संतोष मांडवे, पोपट मोरे, शैलेश लोहार, हूमाय तांबोळी, विक्रम गोडसे, लखन पवार, संभाजी पाटोळे यांच्या समवेत खटाव-माण तालुक्यातील शेतकरी वर्ग उपस्थित होते.
राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने कातर खटाव येथे रस्ता रोको आंदोलन
by Team Satara Today | published on : 22 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा