सातारा : सातारा बसस्थानकातील सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये शनिवारी दुपारी एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला. नंदू क्षणमुखखैया हिरेमठ (वय ६५, रा. सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बसस्थानक परिसरातील चहा टपरीवर ते काम करत होते. या घटनेने बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.
केबिनमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. बसस्थानक चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पवार यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. त्यातून मृताची ओळख पटली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी मृतदेह केबिनमधून बाहेर काढला. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तो रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.पोलिसांनी करंजे येथे राहणाऱ्या मृताच्या भाच्याला याबाबत माहिती दिली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
सातारा बसस्थानकातील सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
by Team Satara Today | published on : 10 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा