01:27pm | Oct 03, 2024 |
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या गोटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील कालपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. भाजपकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय. यासाठी पक्षाच्या हायकमांडकडून काही प्रमुख नेत्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे निरीक्षक त्या त्या मतदारसंघात जावून आढावा घेत आहेत. पण या निरीक्षकांनादेखील आता अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची माहिती समोर येत आहे. कारण काही मतदारसंघांमध्ये भाजप पक्षातील अनेक नेते इच्छुक आहेत. यावरुन पक्षांतर्गत गटबाजी आणि मतभेद समोर येत आहे. पुण्यात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे निरीक्षकांसमोरच भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे या घटनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे. संबंधित घटना ही पुण्यात घडली आहे. पुण्यात खडकवासला मतदारसंघावरुन भाजपच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक प्रसन्न जगताप आणि नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात ही खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोरच भाजप नेत्यांमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येत आहे. अमित शाह यांनी नुकतंच आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपापसात कोणताही वाद, मतभेद न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. असं असताना खडकवासला मतदारसंघावरुन भाजपच्या बैठकीत राडा झाला. खडकवासला मतदारसंघात भाजप बैठकीत आमदार भीमराव तापकीर त्याचबरोबर इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप आणि भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला.
या बैठकीत भाषणाच्या मुद्द्यावरून इच्छुक उमेदवार आणि आमदारांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांना बोलू न दिल्याने बैठकीत नाराजी होती. या बैठकीत इच्छुक उमेदवारांचं गुप्त मतदान होतं, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण यावेळी भाजप नेत्यांमध्ये वाद झाला. या वादानंतर खडकवासला मतदारसंघात भाजपमध्येच उमेदवारीवरून दोन गट आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.
“काल आमच्या खडकवासला मतदारसंघाची बैठक होती. मला सकाळी अकरा वाजता मेसेज आला. फोन वगैरे आला नाही. मी इच्छुक आहे, त्यामुळे शक्यतो फोन येत नाहीय. फक्त मेसेजच येत आहे. या कार्यक्रमात सुरुवातीला आमच्या भागातील नेतेमंडळी बोलून गेले. त्यानंतर पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक बोलणार होते की, मला दोन मिनिटं बोलू द्या. मी इच्छुक आहे ते सांगू द्या. पण स्थानिकांनी माझा आवाज दाबला”, अशी प्रतिक्रिया एका इच्छुक भाजप नेत्याने दिली.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |