सातारा : अपघातात जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश विष्णू भोसले रा. तांबवे ता. कराड, जि. सातारा यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम श्वास हॉस्पिटल सातारा आणि त्यानंतर वेणूताई यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल कराड येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.