सातारा : राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत 2026-27 अंतर्गत काढणी पश्चात पायाभूत सुविधा, गोदाम, मिनि ऑईल इत्यादी बाबींसाठी शेतकरी लाभार्थ्यांसाठी अनुदान योजना मंजूर असून पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.
प्रकल्पासाठी वितरीत अनुदान एकूण प्रकल्प खर्चाच्या किमती पेक्षा कमी असल्यामुळे उर्वरित निधीची व्यवस्था अर्जदाराने लाभार्थी स्वतःचे भांडवल (स्वबचत), बँक कर्ज, राज्य सरकार कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF), ग्रामीण विकास, कृषी-उद्योग किंवा लहान उद्योगांसाठी असलेल्या इतर सरकारी योजना किंवा अनुदानातून इ. मार्गानी करणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी, सहकारी, खासगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, तेलवार प्रक्रिया करणाऱ्या नोंदणीकृत नवीन कंपनी किंवा प्रकल्प, अभियानांतर्गत निवड केलेले मूल्य साखळी भागीदार पात्र असतील. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सातारा व तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.