सातारा : सातारा शहरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना १४ मे रोजी दुपारी साडेबारा ते पावणेएक या वेळेत सातारा शहरात घडली. वेदांत संतोष कांबळे (वय २०, रा. पंताचा गोट) याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.