सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे विक्रेता दिन उत्साहात; विविध दैनिकांच्या प्रतिनिधींनी विक्रेत्यांना गुलाबपुष्प देऊन केले स्वागत

by Team Satara Today | published on : 15 October 2026


सातारा : शहर झोपलेले असताना पहाटेच रस्त्यावर उतरून घराघरांत बातम्या पोहोचवणारा, समाजाला देश-विदेशातील घडामोडींशी जोडणारा आणि वाचनसंस्कृती जपणारा खरा शिलेदार म्हणजे वृत्तपत्र विक्रेता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांचा प्रवास वाचकांपर्यंत पूर्ण करण्यामध्ये विक्रेत्यांचे योगदान अनमोल आहे.
१५ ऑक्टोबर रोजी वृत्तपत्र विक्रेता दिन आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि जगन्नाथजी कोठेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना पेढेवाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. तसेच विविध दैनिकांच्या प्रतिनिधींनी विक्रेत्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र माळी यांनी वृत्तपत्र विक्रेता दिनाचे महत्त्व विशद करत मनोगत व्यक्त केले. वृत्तपत्र विक्रेते ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता पहाटेपासून आपले कर्तव्य बजावतात. समाजात वाचनसंस्कृती रुजविण्यासोबतच लोकशाहीचा जागर करण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करतात, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमाला स्टँड डेपोचे उपाध्यक्ष ताजुद्दीन आगा, राज्य संघटनेचे सचिव गणेश पवार, तुषार खांडेकर, लहुराज लवळे, विकास क्षीरसागर, गणेश भोरे, रमेश जाधव, सचिन लबडे, सुदर्शन पोळ, प्रवीण शिंदे, विनोद शिंदे, युवराज आगलावे, समीर आतार, शब्बीर आतार, सुधीर पांढरे आणि जुबेर शेख उपस्थित होते.
राजवाडा डेपोतही विक्रेता दिनाचा उत्साह
सातारा येथील राजवाडा डेपोमध्येही प्रतिमापूजन करून वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. यावेळी उमाजी निकम, महेश पवार, संतोष फरांदे, विशाल भुजबळ, अभिजित पडळलू, अभिजित रसाळ, सतीश गाडे, अभय व्हावळ, विजय महामुनी, विजय कुंभार, गणेश जायगुडे, संदीप गायकवाड, नौशाद शेख, विनायक गायकवाड, शिवाजी माने, सतीश धडवई, जाकीर शेख, अवधूत लोहार, सतीश गजधरणे आणि लोखंडे बापू उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरबीआयचा नियम पाळावाच लागणार; जिल्हा बँकेतील दहा वर्षांच्या संचालकांच्या अपात्रतेवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्ट मत; भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाच्या चर्चेकडे लक्ष
पुढील बातमी
दुष्काळामुळे मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच घेण्याचा निर्णय कराड नगरपरिषदेचा निर्णय; अनावश्यक खर्चाला फाटा; गर्दीचे नियोजन, बाहेरही स्क्रीनची व्यवस्था

संबंधित बातम्या