मुंबई : महाराष्ट्रातील अग्निवीरांना आता थेट पोलीस दलात आणि इतर तत्सम पदांवर सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जे अग्निवीर शासकीय सेवा करू इच्छितात त्यांच्यासाठी नोकरीचा मार्ग खुला झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, अग्निवीरांची पहिली तुकडी त्यांचा कार्यकाळ संपवून परत येणार आहेत. त्यातील अग्निवीरांना पोलीस आणि इतर तत्सम पदांवर त्यांना सामावून घेणार आहोत. त्यांना परीक्षा, प्रशिक्षणाची अट असणार नाही. त्यांना वयातही सूट दिली जाणार आहे. अग्निशमन दलातही त्यांना घेणार आहोत. जेवढे अग्निवीर शासनात येऊ इच्छितात त्यांना सामावून घेणार आहोत. नौदलातून जे अग्निवीर येतील त्यांना कोस्टल सुरक्षेत सामावून घेतले जाईल. विशेष बाब म्हणून पदांच्या संख्येची शिथिलता करून जेवढे अग्निवीर येतील त्यांना कोस्टल सुरक्षा सेवेत घेतले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
तसेच दुष्काळाबाबत मंत्रिमंडळात अनेक तालुक्यांबाबत आढावा घेतला गेला. ज्या तालुक्यात ट्रिगर २ चे निकष बसत नसतील तर त्या त्या तालुक्यांमधील जमिनीवरची परिस्थिती पाहून त्या तालुक्यांनाही दुष्काळाची मदत द्यायची अशी कार्यप्रणाली अंमलात आणण्याचं ठरवले आहे. उपसमितीने याबाबत तालुक्यातील परिस्थिती जाणून घ्यावी. विशेष बाब म्हणून आपण याला मान्यता दिली आहे. कुठल्या तालुक्यावर अन्याय होणार नाही. मंडल स्तरावरही तालुक्यात जाण्याचा निर्णय आम्ही केला आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
विनापरीक्षा अग्निवीरांना थेट पोलीस दलात नोकरी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा