अत्याचारासह जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 15 October 2024


सातारा : प्रेम असल्याचे सांगून व लग्न करतो असे सांगून युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी प्रसाद कोरडे याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताच्या आईने युवतीला जातीवाचक बोलल्याने तसा गुन्हाही दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिसेंबर 2023 पासून वेळोवेळी ही घटना घडली आहे. प्रसाद याने युवतीला प्रेम असल्याचे सांगून करंजे येथील फ्लॅटवर, महामार्गावरील लॉज तसेच फलटण येथील लॉजवर अत्याचार केले. युवतीने विवाहाचा तगादा लावल्यानंतर प्रसाद याने विवाह करण्यास नकार दिला, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू
पुढील बातमी
जुन्या एमआयडीसीतून बोनेटची चोरी

संबंधित बातम्या