सातारा : ट्रान्सफाॅर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोनगाव (माहुली), ता. सातारा येथील कॅनॉल जवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधील 60 ते 70 किलो वजनाची व 28 हजार रुपये किंमतीची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
सोनगाव (माहुली) येथील कॅनॉलजवळ ट्रान्सफाॅर्मरमधील तांब्याच्या तारेची चोरी
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा