शिंदे-पवार गटात आज उमेदवारी जाहीर होणार

by Team Satara Today | published on : 21 October 2024


मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कालच भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे, गिरीष महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपपाठोपाठ आज शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवारांची यादीही जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्यल्यानुसार, भाजप 158, शिंदे गट 85 आणि अजित पवार गटाला 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि अजित पवार यांच्यातही काही जागांसाठी पेच निर्माण झाला आहे. त्यात भर म्हणून आठवले गट आणि इतर मित्रपक्षांनीही जागा मागितल्याने काही जागांवरून तिढा वाढला आहे.

महायुतीच्या जवळपास 250 हून अधिक जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. उमेदवाराला तयारी आणि प्रचारासाठी वेळ मिळावा म्हणून आता याद्या जाहीर करण्यास सुरूवात झाली आहे. शिंदे गट आणि येत्या एक दोन दिवसांत अजित पवार हेदेखील आपापल्या गटातील उमेदवारांची नावे जाहीर करतील, अशी शक्यता आहे.

दिंडोरी विधानसभेवर शिंदे सेनेने दावा केला आहे. पण या जागेवर अजित पवार गटाचे नगरही झिरवाल हे आमदार आहेत. पण त्या जागेसाठी माजी आमदार धनराज महाले इच्छूक असल्याने त्यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गटाची कामगिरी फारशी चांगली नव्हती, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर विजय मिळाला होता. तर शिंदे गटाला 15 पैकी सात जागांवर विजय झाला. त्यातच विधानसभेमुळे अजित पवार गटाचे काही विद्यमान नेत आणि आमदार पुन्हा शरद पवारांच्या वाटेवर असल्यामुळे अजित पवारांना जागावाटपात कमी जागा मिळणार असल्याची चर्चा आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
प्रचाराच्या वाहनावर फक्त दोन फूट उंचीचा झेंडा

संबंधित बातम्या