गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

प्रशासनाच्या "शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत" विशेष कामगिरी

by Team Satara Today | published on : 15 August 2025


सातारा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील प्रशासकीय कामकाजाचा निपटारा होण्याच्या दृष्टीने शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम संपूर्ण राज्यभर राबवली होती. या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश शिला राजकुमार बुध्दे यांचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
राज्य सरकारने ही मोहीम राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर राबवली होती. या अंतर्गत एकूण बारा हजार पाचशे शासकीय कार्यालयांमध्ये योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. या योजनेमध्ये सातारा पंचायत समितीने सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती.त्यामुळे सातारा पंचायत समितीने पुणे विभागातून पंचायत समिती या गटातून तृतीय क्रमांक पटकाविला.
आज पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते बुद्धे यांचा गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांसह मान्यवर उपस्थित होते.
सातारा पंचायत समितीत कामकाज करीत असताना पंचायत समितीतील सर्व खाते प्रमुख त्याचबरोबर कक्ष अधिकारी, कक्ष अधीक्षक यासह सर्व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्यामुळे, परिश्रमामुळे या मोहिमेत यशस्वीरित्या कामकाज करू शकलो. हे सर्व यश पंचायत समितीत कामकाज करणाऱ्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आहे, असे यावेळी सतीश बुद्धे म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणेच्या विशेष मोहिमेतील कामगिरीबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान
पुढील बातमी
तीन महिन्यात सहा बालविवाह रोखण्यात यश

संबंधित बातम्या