सातारा : आकले तालुका सातारा येथे अज्ञाताने घरफोडी करून घरातील 25 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. याप्रकरणी राम बबन चव्हाण यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरीचा हा प्रकार 25 जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरात नसताना चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप जड वस्तूने तोडले व घरात प्रवेश करून वीस हजार रुपये किमतीचे तांब्याचे चार हांडे व पाच हजार रुपये किमतीचे तांब्याच्या दोन कळशा असा 25 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करत आहेत.
आकले येथे घरफोडी; 25 हजाराचा मुद्देमाल लांबवला
by Team Satara Today | published on : 12 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा