सातारा : आषाढ महिन्यातील बैल बेंदूर सणा निमित्त सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील माने परिवाराने आपल्या लाडक्या सर्जा राजांची अशी भव्य मिरवणूक डीजे अर्थात डॉल्बीच्या निनादात सातारा शहरातून बुधवारी सायंकाळी काढली.
यावेळी फुलांनी तसेच विविध रंगांनी सजवलेल्या बैलांची ही शोभिवंत मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरांची गर्दी लोटली होती.